श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांचे प्रतिपादन
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांचे प्रतिपादन
“युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी विशेष युवक वार्षिक शिबिराचा समारोप
लातूर दि. २९ मार्च
आज समाजामध्ये विविध प्रकारच्या सामाजिक समस्या असल्याचे आपणास दिसून येते. आपल्या देशात एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी सेवालयाचे कार्य आपल्या देशासाठी प्रेरणादायी आहे तेव्हा आपण प्रा. रवी बापटले यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजामध्ये कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, लातूर आणि आम्ही सेवक, हैप्पी व्हिलेज, हासेगाव ता.औसा जि.लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हॅप्पी व्हिलेज, हासेगाव येथे “युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी विशेष युवक वार्षिक शिबिराचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते.
यावेळी विचारपीठावर आम्ही सेवकचे संस्थापक प्रा. रवी बापटले, महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सहसचिव सुनील मिटकरी, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडेगावे, संचालक अँड. काशिनाथ साखरे, सामाजिक कार्यकर्ते सुपर्ण जगताप, डॉ. मनोज मोठे, प्राचार्य प्रो. डॉ. संजय गवई, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे, प्रो. डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. मनोहर चपळे, प्रा. किसनाथ कुडके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, समर्पित भावनातून काम करणाऱ्या कमी समाजामध्ये जाणवत आहे. एचआयव्ही बाधित रुग्णासाठी सेवालय उभे करणारे प्रा. रवी बापटले संघर्ष योध्दे आहेत. मनातला मानवतावादी धर्म जागृत करून समाज ऋण फेडले पाहिजे. कष्ट करून स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करणारा हाच करा ईश्वराचा पाईक असतो रुग्णांना आत्मविश्वास देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचे काम सेवालयाने केले आहे. असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना प्रदीप दिंडेगावे म्हणाले की, तरुणांमध्ये समाजभान निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करते. समाज माध्यमात वाया घालणाऱ्या तरुण पिढीने प्रा. रवी वापरले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुपर्ण जगताप म्हणाले की, शरीराला रिचार्ज करण्याचे काम वनस्पती करतात. वनस्पतीशी आपले नाते स्नेहाचे असले पाहिजे. बालकाप्रमाणे आपणही निरागस झाले पाहिजे झाडे आहेत तर आपली वाढ आहे म्हणून निसर्गावर प्रेम करा असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि शिबिरातील विविध कार्यक्रमाचा आढावा कार्यक्रमाधिकारी डॉ. रत्नाकर बेडगे यांनी सांगितला. स्वागतपर मनोगत प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केले.
यावेळी ऋतुजा भिसे, अजय राऊत यांनी मनोगते व्यक्त केली. तसेच उत्कृष्ट स्वयंसेवक आविष्कार चौधरी, नैतिक माने ऋतुजा भिसे, जयश्री भंडे, धनश्री स्वामी यांचा सत्कार करण्यात अल्ला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा भिसे, जयश्री भांडे यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार डॉ. मनोहर चपळे यांनी मानले.
या कार्यक्रमाला रासेयो स्वयंसेवक-स्वयंसेविका आणि हॅपी व्हिलेज येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0