कॉल्पोस्कोपी कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
कॉल्पोस्कोपी कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : लातूर स्त्री रोग संघटनेच्या वतीने रविवारी, दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कोल्पोस्कोपी कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत एकूण दहा महिला रुग्णांची मोफत कॉल्पोस्कोपी करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ठाणे येथील ख्यातनाम स्त्री रोग तज्ज्ञ तथा आदिवासी भागातील महिलांसाठी नेत्रदीपक कार्य करणाऱ्या डॉ. प्रिया गणेशकुमार यांची उपस्थिती होती.
लातूरच्या एमआयडीसी परिसरातील हॉटेल भारत फाईन डाईन या ठिकाणी ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत ७५ हुन अधिक स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांनी आपला सहभाग नोंदविला . यावेळी लातूर स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा पाटील, सचिव डॉ. मनिषा बरमदे, कोषाध्यक्ष डॉ. अनुसया वलसे, ज्येष्ठ स्त्री रोग तथा वंध्यत्व निवारण तज्ज्ञ तथा समन्वयक डॉ. कल्याण बरमदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. ही कार्यशाळा गर्भपिशवीच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनासंबंधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. प्रिया गणेशकुमार यांनी महिलांनी गर्भाशय मुखाचा कर्करोग होऊ नये यासाठी कोणकोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, यासंदर्भात अतिशय मौलिक असे मार्गदर्शन केले. या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे, घ्यावयाची काळजी यांसह आजघडीला उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचार पध्दतीविषयीही डॉ. प्रिया गणेशकुमार यांनी माहिती दिली. डॉ. प्रिया गणेशकुमार ह्या सन २०२१ ते २०२४ या काळात भारतीय स्त्री रोग संघटनेच्या कर्करोग समितीच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑन्कोलॉजी सेंटरचे जाळे संपूर्ण भारतभर पसरले आहे. त्या संपूर्ण भारतभर कॉल्पोस्कोपी कार्यशाळांचे आयोजन करून स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांना मार्गदर्शन करत असतात. हॉटेल भारत फाईन डाईनमध्ये कार्यशाळेस संबोधित केल्यानंतर त्यांनी दुपारच्या सत्रात मंठाळे नगर मधील वलसे हॉस्पिटलमध्ये दहा महिला रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. यावेळी एचपीव्ही लसीकरणाबाबत डॉ. आरती ढोबळे यांनी तर चांगल्या क्लिनिकल प्रॅक्टिसेस शिफारसीबाबत डॉ. रचना जाजू यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत डॉ. वैशाली दाताळ, डॉ. शारदा इरपतगिरे, डॉ. रोहिणी पौळकर, डॉ. स्वाती पाटील, डॉ. प्रेरणा राजे देशमुख, डॉ. जाकेरा काझी, डॉ. शीतल हुरणे, डॉ भालचंद्र , डॉ. प्रदीप ढेले, डॉ. स्वाती गोरे, डॉ. राजेश दराडे, डॉ. यादव यांसह एकूण ७५ हुन अधिक स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते. या कार्यशाळेत केवळ लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर नांदेड, धाराशिव जिल्ह्यातीलही स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी लातूर स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा पाटील, सचिव डॉ. मनिषा बरमदे, कोषाध्यक्ष डॉ. अनुसया वलसे, समन्वयक डॉ. कल्याण बरमदे यांनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0