सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे अहमदपूरात जंगी स्वागत
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचे अहमदपूरात जंगी स्वागत
अहमदपूर : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं प्रथमच अहमदपूर शहरात आगमन झाले.कॅबिनेट मंत्री बाबासाहेब पाटील यांचे शहरात विविध संस्था, संघटना, शासकीय निमशासकिय कार्यालयाच्या वतीने तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी बॅंड बाजा ढोल ताशे फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले.
बाबासाहेब पाटील यांना २१ डिसेंबर रोजी संध्याकाळी सहकार खाते मिळाल्याची वार्ता शहरात समजल्यानंतर शहरातील छत्रपति शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यानी फटाक्याची आतीषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. तर २२ डिसेंबर रोजी अहमदपूर तालुक्यात प्रथमच प्रवेश करताच सांगवी फाटा,रुध्दा, रुई, साई गणेश मिल्ट्री कॅम्प येथे कॅबिनेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागत समारोहामुळे शहरात जिकडे पहावे तिकडे फटाक्याची आतीषबाजी दिसुन येत होती. अहमदपूरकरांनी प्रत्यक्षात दुसरी दिवाळी साजरी केल्याचे पहावयास मिळाले. तालुक्याला नव्यानेच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यामुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यासह नागरिकांचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. अगदी सकाळी १०पासून शहरातील मुख्य रस्त्यासह नांदेड रोडवर नागरिकांनी कॅबीनेट सहकारमंत्र्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.
.....................
कॅबिनेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राष्टसंत कै. डॉ. शिवलींग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळ , अण्णाभाऊ साठे , शेर - ए -हिंद शहीद टिपू सुलतान,स्वा. विर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
महात्मा बस्वेश्वर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0