विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगारासाठी वनस्पतीशास्त्रातील कौशल्य आत्मसात करावे
विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगारासाठी वनस्पतीशास्त्रातील कौशल्य आत्मसात करावे
लातूर दि. ०१ मार्च
आजच्या विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगार निर्मितीसाठी वनस्पतीशास्त्रातील कौशल्य आत्मसात करून व्यवसाय वृद्धिंगत केला पाहिजे असे प्रतिपादन सर्वज्ञ, आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. कन्हैया कदम यांनी केले.
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
या शैक्षणिक सहलीचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. दीपक चाटे, प्रो. डॉ. शिवप्रसाद डोंगरे, डॉ. मनोज गायकवाड, डॉ. उज्ज्वला गायकवाड, प्रा. प्रतीक्षा मामडगे, प्रयोगशाळा सहाय्यक दत्ता पांचाळ यांची उपस्थिती होती.
या सहलीतर्गत लिंबगाव (नांदेड) येथे सर्वज्ञ आयुर्वेदिक चिकित्सालयाला भेट देण्यात आली. यावेळी संचालक डॉ. कन्हैया कदम यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०अन्वये औषधी वनस्पती आणि औषध निर्मिती कौशल्य विकासावर भर दिला. विद्यार्थ्यांना वनस्पती पासून औषध तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल जसे कच्चामाल संकलन व वर्गीकरण, सत्व काढण्याची प्रक्रिया, शुद्धीकरण, औषध निर्मिती पॅकिंग व वितरण याबद्दल सविस्तर माहिती दिली. आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतो, गुळवेल मधुमेह नियंत्रणात आणण्याचे काम करते, अश्वगंधा मानसिक ताण कमी करते, अर्जुन हृदय रोगावर फायदेशीर आहे, ब्राह्मी व शंखपुष्पी यांचा उपयोग मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी होतो. याचीही माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्याना बुद्धभूषण कांबळे (बीएससी द्वितीय वर्ष) काँग्रेस गवताच्या बियापासून (पार्थिनियम ग्रास) बुरशी रोग औषधी तयार करणे, अपेक्षा मदानी (बीएससी प्रथम वर्ष)-तुपापासून शतदौत तयार करणे, साक्षी चाटे (बीएससी प्रथम वर्ष)-अँटी डेंड्रफ शाम्पू तयार करणे, आशिष मार्कड (बीएससी द्वितीय वर्ष) -वनस्पती पासून कावीळचे औषध तयार करणे,
आदित्य कांबळे (बीएससी प्रथम वर्ष)- हर्बल सौंदर्यप्रसाधने तयार करणे आणि ऋतिक बनाटे (बीएससी प्रथम वर्ष)-औषधी साबण तयार करणे प्रकल्प देण्यात आले.
डॉ. दीपक चाटे म्हणाले की, ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक ठरली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत औषधी वनस्पती व औषध निर्मिती कौशल्य विकासावर भर देत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष औषध निर्मिती प्रक्रिया, औषधी वनस्पतीचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचे भान मिळविले असल्याचे ते म्हणाले.
सर्वांचे आभार डॉ. मनोज गायकवाड यांनी मानले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0