मनसेच्या वतीने लातूरच्या राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणावर तिसरे भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
मनसेच्या वतीने लातूरच्या राजस्थान विद्यालयाच्या प्रांगणावर तिसरे भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
लातूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेना लातूर व कृषी नवनिर्माण अॅग्रो प्रोडयूसर कंपनी, नरवटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या परिसरात दि. 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2025 या दरम्यान "कृषी नवनिर्माण" 2025 या राज्यस्तरीय तिसऱ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
गेल्या 5 ते 7 वर्षापासून मराठवाडयातील शेतकरी कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाला सामोरा जात आहे. सततच्या हवामानातील बदलामुळे कधी पाऊसच नाही तर कधी जास्तीचा पाऊस अशी विचित्र परिस्थीती झाल्याने कोणतेच पीक मराठवाडयातील शेतकऱ्यांच्या हाती लागायला तयार नाही. त्यामूळे मराठवाडयातील शेतकरी कर्जबाजारी होऊन वैफल्यग्रस्त झाला आहे अशा बिकट परिस्थीतीमुळे मराठवाडयातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. या दुष्काळी परिस्थीतीत शासन मात्र शेतकऱ्यांना कसलीही मदत किंवा दुष्काळवरील उपाययोजना करावयास तयार नाही त्यामुळे कमी पावसात पाण्याचे व्यवस्थापन करुन आधुनिक तंत्रासह शेती कशी करावी शेतीला जोडधंदयाची जोड देऊन शेतकऱ्यांना शेतीक्षेत्रात स्वावलंबी होता यावे शेतकऱ्यांनी पारंपारीक शेतीपद्धतीतून बाहेर पडून आधूनिक शेतीची कास धरुन त्यांचे उत्पन्न किमान दुपटीने वाढावे, प्रदर्शनातील व्यापक प्रबोधनातून शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारु नये, जागतीक दर्जाचे नवे शेतीतंत्र शेतीतील साधन सामग्री अत्याधुनिक शेती अवजारे कृषीतील नवनविन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहीती व्हावे या उद्दांत हेतूने या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
या कृषीप्रदर्शनात 300 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार आहेत या प्रदर्शनात कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, आत्मा पणनमहामंडळ, पशूसंवर्धन विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती मत्स्य संवर्धन विभाग, रेशीम शेती विभाग, वखार महामंडळ या सर्व शासकीय विभागांचा सहभाग असेन या प्रदर्शनास शासनाच्या शेती संदर्भातील विविध योजना व धोरण या विषयांवर कृषी तंज्ञानी थेट संवाद साधता येणार आहे.या प्रदर्शनात शेतीतील विविध क्षेत्रातील विषयतज्ञ आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या तज्ञानी व्याख्याने ठेवली आहेत.या प्रदर्शनात खते, बि-बियाणे, औषधे, शेती औजारे सौरउर्जा कृषी विषयक पुस्तके, महीला बचत गट यांचे स्टॉल असतील या प्रदर्शनासाठी प्रवेश निशुल्क असेन या प्रदर्शनासाठी भव्य पार्कीगची व्यवस्था, 24 तास जनरेटर, व्यवस्थापन कार्यालय सभागृह, टॉयलेटस, फायर स्टेशन या सर्व बाबींची व्यवस्था असणार आहे.
या प्रदर्शनात लहान मुलांसाठी बालजत्रा व येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फुड मॉलची व्यवस्था करण्यात आली आहे.
तेव्हा मराठवाडयातील सर्वच शेतक-यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संतोष नागरगोजे यांनी केले आहे.
यावेळी संतोष नागरगोजे डॉ. नरसिह भिकाने, रणवीर उमाटे,रवि सुर्यवंशी, महादेव कदम, किरण चव्हाण, पांडुरंग कदम,सचिन सिरसाट, भागवत कांदे आधी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0