मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती
मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती
समितीच्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन
लातूर : मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लातूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या उभारणीमुळे अनेक शेतकऱ्यांची हजारो हेक्टर सुपीक जमीन या मार्गात जाणार आहे. त्यासाठी शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत आहे. मात्र, शासन शेतकऱ्यांच्या विरोधाला डावलून हा महामार्ग करण्याचा घाट घालत आहे. त्यामुळे मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे. केवळ लातूरमध्येच नाही तर शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या सर्व जिल्ह्यात असे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला या महामार्गाचा निर्णय बदलण्याची आग्रही विनंती करण्यात येणार आहे. याउपरही शासन आपला निर्णय कायम ठेवणार असेल तर मराठवाडा शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने पुढील काळात यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शक्तीपीठ बाधित सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन गजेंद्र येळकर , अनिल ब्याळे , रवी मगर, संजय मोरे, शेखर ब्याळे , बसवराज झुंजारे , श्रीधर माने, परमेश्वर मोटे , वैजनाथ हजारे, बाबुराव हावळ, गुंडाप्पा भोसले, बाळू कराड, गणेश हाके, दयाराम देशमुख, विठ्ठल देशमुख, गणेश माने, राजेंद्र पाटील, संजय माने आदींनी केले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025मुख्यमंत्री-युवा-कार्य-प्रशिक्षणार्थ्यांचा-लातूर-जिल्हाधिकारी-कार्यालयावर-धडकला-मोर्चा
February 24, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0