नेपाळमध्ये पुन्हा राजेशाहीचे वारे
नेपाळमध्ये पुन्हा राजेशाहीचे वारे
नेपाळमधील नागरिक पुन्हा एकदा राजेशाही प्रस्थापित व्हावी यासाठी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा जीवही गेला आहे. जगातील एकमेव हिंदू राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये सर्वाधिक काळ राजेशाही होती. नेपाळमध्ये जवळपास २४० वर्ष राजेशाही होती. १९९६ साली पहिल्यांदा नेपाळमधील डाव्या विचारांच्या माओवाद्यांनी राजेशाही विरुद्ध बंड पुकारले आणि देशात लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी आंदोलन झाले. जगात सर्वत्र लोकशाहीचे वारे असताना नेपाळमध्ये लोकशाहीच असावी अशा विचाराने तरुणांनी देखील माओवाद्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला मात्र नेपाळमध्ये राजेशाहीची पाळेमुळे खोलवर रुतली असल्याने या आंदोलनाला लगेच यश मिळाले नाही. २००१ साली नेपाळमध्ये अशी घटना घडली ज्यामुळे राजेशाहीची पाळेमुळेच ध्वस्त झाली. २००१ मध्ये तत्कालीन राजमहालामध्ये नेपाळचे तत्कालीन राजे वीरेंद्र वीर विक्रम शहा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या झाली. या हत्याकांडाने केवळ नेपाळच नाही तर संपूर्ण जग हादरून गेले. या हत्याकांडानंतर ज्ञानेंद्र शहा यांना नवे राजे म्हणून घोषित करण्यात आले. या हत्याकांडानंतर राजेशाही विरुद्ध लोकांच्या मनात चीड निर्माण झाली होती त्यातच २००५ मध्ये राजे ज्ञानेंद्र यांनी नेपाळची घटना रद्द करून टाकली आणि संसद ही बरखास्त केली त्यामुळे माओवादी आणखी चिडले व त्यांनी उग्र आंदोलने केली त्यांच्या या आंदोलनात लोकशाहीवादीही होते. माओवादी आणि लोकशाही वाद्यांनी राजेशाही विरुद्ध थेट यलगार पुकारला त्यामुळे २००८ साली २४० वर्षाची राजेशाही उखडून पडली आणि लोकशाही प्रस्थापित झाली. या आंदोलनात जवळपास १६ हजार नागरिकांचा जीव गेला. २००८ साली राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाल्यावर तेथील नागरिकांना वाटले की लोकशाही मार्गाने आता आपला देश प्रगती करेल. शेजारील भारताने जशी लोकशाही मार्गाने प्रगती केली तशीच प्रगती आपला देशही करेल पण नागरिकांची ही अपेक्षा फोल ठरली. कारण नेपाळमध्ये लोकशाही प्रस्थापित होऊन देखील नेपाळला स्थिर सरकार मिळू शकले नाही. २००८ ते आतापर्यंत म्हणजे सतरा वर्षात नेपाळमध्ये १४ सरकारे आली. त्यात पुष्लकमल दहल यांचे सरकार तीन वेळा तर के पी ओली शर्मा यांचे चार वेळा सरकार आले पण एकानेही स्थिर सरकार दिले नाही. या सरकारांच्या काळात नेपाळमध्ये भ्रष्टाचार प्रचंड वाढला. छोट्या छोट्या कामांसाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत. भ्रष्टाचारामुळे या सरकार विरुद्ध जनतेत प्रचंड नाराजी निर्माण झाली हीच नाराजी हेरून राजे ज्ञानेंद्र यांनी फेब्रुवारी मध्ये एक निवेदन जरी केले या निवेदनात त्यांनी म्हटले की राष्ट्र आणि राष्ट्राचे ऐक्य वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. राजे ज्ञानेंद यांच्या या निवेदनानंतर नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही प्रस्थापित व्हावी असे वाटणारा वर्ग रस्त्यावर आला आणि त्यांनी पुन्हा राजेशाही प्रस्थापित व्हावी यासाठी आंदोलन केले. राजेशाही समर्थकांचे हे आंदोलन कुचलून टाकण्यासाठी तेथील सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. या आंदोलनांमुळे नेपाळमध्ये लगेच राजेशाही प्रस्थापित होईल असे नाही मात्र राजेशाही प्रस्थापित व्हावी असे वाटणारा जो वर्ग आहे त्यांना आशेचा किरण दिसला आहे. तो वर्ग यापुढे ही राजेशाही साठी रस्त्यावर उतरेल. नेपाळमध्ये राजेशाहीचे वारे पुन्हा वाहू लागले आहे हे नक्की.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0