बिलोली ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी मुख्यालयीच राहत नाहीत
बिलोली ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी मुख्यालयीच राहत नाहीत
बिलोली (प्रतिनिधी ):
बिलोली येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात अनेक डॉक्टर्स मुख्यालय न राहता बाहेरून अप-डाऊन करत असतात. डॉक्टर्स मुख्यालयी राहत नसल्यामुळे तालुक्यातील रुग्णांवर पाहिजे तसा उपचार होत नसल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील एका जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले असता, बिलोली शहरात कुठलेही सोयी सुविधा नसल्यामुळे राहत नसून शासकीय पगार परवडत नसल्यामुळे वैद्यकीय व्यवसाय करावे लागते, असे उत्तर एक जबाबदार वैद्यकीय अधिकारी दिले असल्याचे बिलोली शहरातील माहिती अधिकार तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी सांगितले आहेत.
नेत्र चिकित्सा अधिकारी हे पद रिक्त असूनही ते रिक्त पद अद्यापपर्यंत भरण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नेत्ररोग असणारे तसेच वृद्धांना त्याचे उपचार करून घेण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इथे त्याची सोय नसल्यामुळे त्यांना तेलंगणा राज्यातील जवळ असलेल्या बोधन शहरातील लायन्स क्लब या ठिकाणी रेफर म्हणजेच त्यांना पाठवले जाते. मात्र त्या ठिकाणीही त्यांची लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
रुग्णालयात सोनोग्राफी आहे पण ते फक्त गरोदर महिलांसाठी आठवड्यातून एकदा वापरले जाते. एक्स-रे मशीन आहे पण त्याचा रिपोर्ट पुण्याहुन येतो. आदी परिचारिकेचेही अर्ध्या जागे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी हे बिलोली शहरात म्हणजेच मुख्यालय राहत नाहीत या संदर्भात एका जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणतात की, शासकीय पगार हे परवडणारे नसल्यामुळे त्यांनी बाहेरगावी खाजगी वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यासाठी शासनाची परवानगी आहे का, असे विचारले असता अनुत्तरीत झाले होते. अनेक डॉक्टर्स आठवड्यातून एकदा किंवा दोनदा येतात असे निदर्शनास आले आहे. व्यवसाय रोख भत्ता घेऊनही पुन्हा खाजगी व्यवसाय कसे करतात असा सवाल ही करण्यात आली आहे. सरळ सरळ शासनाची फसवणूक करत असून यावर चौकशी झाली पाहिजे. मुख्यालयी का राहत नाहीत याबद्दल विचारले असता बिलोलीतच राहावे असे शासनाचे कुठलेही परिपत्रक नसल्याचेही जावई शोध तिथल्या एक जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्याने लावले आहेत. याकडे जिल्हा शल्य चिकित्सक लक्ष देतील का अशी चर्चा बिलोली शहरातील जनमानसात होत आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0