शांत मन आनंदी जीवन या विषयावर विश्वप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर बी के शिवानी यांच्या प्रेरणादायी व्याख्यानचे उदगिरात आयोजन
शांत मन आनंदी जीवन या विषयावर विश्वप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर बी के शिवानी यांच्या प्रेरणादायी व्याख्यानचे उदगिरात आयोजन
उदगीर : "शांत मन आनंदी जीवन" या विषयावर आंतरराष्ट्रीय व्याख्याता ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांच्या प्रेरणादायी
व्याख्यान दि. 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता जिल्हा परिषद मैदान, उदगीर येथे आयोजित
करण्यात आले आहे. ब्रह्माकुमारी शिवानी दीदी ह्या 1996 पासून राजयोग ध्यानाच्या अभ्यासिका आणि
शिक्षिका आहेत, त्यांचा व्यापक लोकप्रिय टेलिव्हिजन शो अवेकनिंग विथ ब्रह्माकुमारीज इ.स. 2007 मध्ये
प्रथम प्रसारित झाला होता जो ब्रह्माकुमारीज आत्म-परिवर्तनावर केंद्रित होता. एका दशकाहून अधिक काळ
या शोने सर्व स्तरातील व्यक्तींना सक्षम केले आहे. प्रेक्षकांनी त्यांच्या भावनांची वैयक्तिक जबाबदारी घेऊन
मानसिक तणाव, नैराश्य, व्यसने, कमी आत्मसन्मान आणि नाखूष संबंधांवर मात केली आहे. इ.स. 2017
पासून बी के शिवानी दीदी हे जागतिक मानसोपचार संघटनेचे गुडविल ॲम्बेसेडर म्हणून कार्यरत आहेत.
मार्च 2019 मध्ये बीके शिवानी दीदी यांना प्रतिष्ठित नारी शक्ती पुरस्कार, भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान,
मानवतावादी वर्तन बदलण्याच्या भूमिकेसाठी प्रदान करण्यात आला. आध्यात्मिक सबलीकरण हा जीवनातील
आनंदाचा आधार आहे. ज्याप्रमाणे मनाला चांगल्या विचारांनी बरे केले जाऊ शकते, हृदय सहानुभूतीने आणि
नातेसंबंधाने, त्याचप्रमाणे देवाच्या मौल्यवान शिकवणी आपल्या वर्तमान आणि भविष्याला सामर्थ्य देत असतात.
विश्वप्रसिद्ध मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानी यांचे व्याख्यान उदगीर शहरात प्रथमच आयोजित केले
आहे. आपल्या सुमधूर वाणीने समुपदेशन करण्यात प्रसिध्द असेलेल्या बी के शिवानी ह्या आध्यात्मिक क्षेत्रातील
नामांकित वक्त्या असून मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्या स्वत: राजयोगाच्या साधक असून त्यांनी मागील
अनेक वर्षापासून राजयोगाबद्दल सर्वसामान्यांमध्ये रुची निर्माण केली आहे. अभियांत्रिकी मधील पदवीत
गोल्ड मेडलिस्टची पार्श्वभूमी असलेल्या बी के शिवानी दीदी यांनी सर्वसामान्यांच्या जीवनातील छोट्या-छोट्या
समस्यांना हात घातला आणि त्या कशा सोडवाव्यात यासाठी सहज साध्य होतील यावर परिणामकारक
समुपदेशन केले आहे. त्याच बरोबर जीवनातील नकरात्मक भावना, अहंकार, ताण तनाव, क्रोध, भिती,
आळस आदींवर विजय प्राप्त करण्यासाठी त्यांनी सहज शक्य होईल असे उपाय सुचविले त्यांच्या या उपायामुळे
लाखो लोकांना तनावमुक्तीचा मार्ग सापडलेला असून ते त्यांचे वैयक्तिक जीवनात सुख आणि समाधानाचा
अनुभव करीत आहेत. आंतरवैयक्तिक संबंध, जीवनाचा ताळेबंद, रिलेशनशिप विथ गॉड, अँगर मेनेजमेंट आदि
अनेक विषयात त्यांचा हातखंडा आहे. या विषयांवरील त्यांचे टिवी शो अत्यंत लोकप्रिय झालेले आहेत.
ब्रह्माकुमारी सेवा केंद्र उदगीरने आपल्यासाठी अनमोल प्रतिनिधी ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे प्रेरणादायी
व्याख्यान सत्र आयोजित केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता ऑनलाईन नोंदणी करणे
आवश्यक आहे संपर्क क्रमांक 9421259449 आहे. प्रेरणादायी व्याख्यानास प्रिय नातेवाईक, इष्टमित्रसह
या कार्यक्रमास उपस्थित रहावेत असे आवाहन ब्रह्माकुमारी महानंदा दीदी यांनी केले आहे. तुमचे आगमन
दिशा बदलणारे ठरेल.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0