चौथ्या-जनसंवाद-ग्रामीण-साहित्य-संमेलनाची-जय्यत-तयारी
चौथ्या-जनसंवाद-ग्रामीण-साहित्य-संमेलनाची-जय्यत-तयारी
खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते २७ रोजी होणार उद्घाटन; संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांची निवड
आ. श्रीजया चव्हाण, माजी आ. राम पाटील रातोळीकर, अभिनेत्री माधुरी लोकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार
नांदेड - प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड व सप्तरंगी साहित्य मंडळ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रणछोडदास मंगल कार्यालयात येत्या २७ जानेवारी रोजी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनासाठी आ. अॅड. श्रीजया चव्हाण, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, माजी संमेलनाध्यक्ष कवी अनंत राऊत, पाणी चित्रपट फेम अभिनेत्री माधुरी लोकरे यांच्यासह आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त लावणी बालकलाकार डॉ. विद्याश्री येमचे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टे, तहसीलदार आनंद देऊळगावकर, पोलिस निरिक्षक वसंत सप्रे, नपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे, गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे, माजी गटशिक्षणाधिकारी दिलिप सुपे, ओबीसी चळवळीतील राष्ट्रीय नेते एस. जी. माचनवार, स्वागताध्यक्ष प्रविणदादा गायकवाड निमंत्रक प्रल्हाद इंगोले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे यांची उपस्थिती राहणार आहे. दिवसभरात ग्रंथदिंडी, चित्र व नाणी प्रदर्शन, पुरस्कार वितरण, परिसंवाद, प्रकाशने, कथाकथन, गझलसंध्या, कविसंमेलन अशा विविध सत्रांतून साहित्य संमेलन संपन्न होणार असल्याने जय्यत तयारी सुरू आहे.
सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाचे चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन मुदखेड शहरात संपन्न होत आहे. या संमेलनाची सुरुवात २७ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर मुख्य समारंभ संपन्न होईल. उद्घाटन समारंभानंतर येथील प्राचार्य डॉ. माधव बसवंते यांच्या अध्यक्षतेखाली 'संविधान लाभधारकांची भूमिका' या विषयावरील परिसंवादात प्रा. संजय बालाघाटे, अॅड. विजय गोणारकर, बालाजी थोटवे हे चिंतक आपले विचार ठेणार आहेत. दु. ४.०० वा. कथाकथन होईल. यात सुप्रसिद्ध कथाकार दिगांबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली राम तरटे, स्वाती कान्हेगांवकर, सुरेश वडजे हे आपल्या स्वरचित आणि सुरस कथाकथनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. त्यानंतर गझलसंध्या हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकारांचा कार्यक्रम होईल. यात रोहिणी पांडे, स्वाती भद्रे, अंजली मुनेश्वर, दिपाली कुलकर्णी, निशा डांगे, विजय वाठोरे, विजय धोबे हे गझलकार सहभागी होतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्तम गेंदे हे असतील. यानंतरच्या सत्रात सुप्रसिद्ध कवी बालाजी कळसे यांच्या अध्यक्षतेखाली ५० कवींचे कविसंमेलन संपन्न होणार आहे. यात प्रमुख अतिथी कवी म्हणून सदानंद सपकाळे, अशोक कुबडे, निरंजन तपासकर हे उपस्थित राहतील. म्हणून समारोपीय सत्रात संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष, निमंत्रक व सप्तरंगी साहित्य मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ठराव वाचन होणार आहे.
दरम्यान, जनसंवाद विशेषांकाचे प्रकाशन व इतर प्रकाशने होणार असून मिलिंद जाधव, साहेबराव डोंगरे व संतोष तळेगावे यांचे चित्र व नाणी प्रदर्शन होणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील कार्यरत मान्यवरांना जनसंवाद पुरस्कार - २०२५ देऊन गौरविण्यात येणार आहे. यात प्राचार्य मालपाणी हरिप्रसाद, विक्तुदास होट्टे, गणेश भालेराव, सुभाष गड्डम, जीवन मांजरमकर, मारोती काळबांडे, प्रा. डॉ. गंगाधर भोपाळकर आदींचा समावेश आहे. तसेच मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान, उमरीच्या पुरस्कारांचेही वितरण होणार आहे. यात बुद्धाजी चव्हाण, जयराम धोंगडे, गुणवंत मिसलवाड, प्रा. डॉ. किशोर इंगोले, अॅड. विजय गोणारकर, प्रा. डॉ. कविता सोनकांबळे, अनिता जाधव, रुचिरा बेटकर, स्वाती कान्हेगांवकर यांचा समावेश आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, सचिव कैलास धुतराज, कार्यालयीन सचिव मारोती कदम, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, राज्य समन्वयक बाबुराव पाईकराव, महिला विभाग प्रमुख रुपाली वागरे वैद्य, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, सचिव चंद्रकांत कदम, उमेश वंजारे, दत्ताहरी कदम, प्रकाश ढवळे नागलगांवकर, राहुल जोंधळे, डॉ. गजानन देवकर, प्रल्हाद घोरबांड, पंडित पाटील बेरळीकर, संजय भारदे, शिवाजी गोडबोले, जळबा सोनकांबळे, गौतम कांबळे, विशालराज वाघमारे, सुभाष लोखंडे आदी परिश्रम घेत आहेत.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0