दि. २० व २१ मार्चला लातूर ग्रंथोत्सव २०२४ चे आयोजन
दि. २० व २१ मार्चला लातूर ग्रंथोत्सव २०२४ चे आयोजन
लातूर : उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय , महाराष्ट्र राज्य, चमुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, लातूरच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथे दि. २० व २१ मार्च २०२५ रोजी लातूर ग्रंथोत्सव - २०२४ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लातूरच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी सौ. वंदना काटकर यांनी दिली. या ग्रंथोत्सवादरम्यान ग्रंथ प्रदर्शन, विक्रीसह विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हा ग्रंथोत्सव कार्यक्रम लातूरच्या औसा रोडवरील आदर्श कॉलनीमधील कम्युनिटी हॉल याठिकाणी होणार आहे. गुरुवार, दि. २० मार्च रोजी सकाळी आठ वाजता क्रीडा संकुलापासून निघणाऱ्या ग्रंथदिंडीने या ग्रंथोत्सवाची सुरुवात होईल. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ, लातूरचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन होईल. यावेळी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य डॉ. नरसिंग कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे , प्राचार्य डी.एन. केंद्रे, कालिदास माने, दिलीप गुंजरगे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ग्रंथदिंडीनंतर ग्रंथोत्सव आणि ग्रंथ दिंडीचे उदघाटन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे राहतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. ओमराजे निंबाळकर, खा. डॉ. शिवाजी काळगे , आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. अमित देशमुख, आ. संजय बनसोडे, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, राज्याचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाह राम मेकले , जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात 'आपला मान आपला स्वाभिमान ' या विषयावरील परिसंवाद होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भूषणकुमार जोरगुलवार, डॉ. राजशेखर सोलापुरे , विलास सिंदगीकर यांची उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर निमंत्रितांचे कवी संमेलन होईल. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार भारत सातपुते हे राहणार आहेत. यामध्ये मान्यवर कवी आपल्या रचना सादर करतील. शुक्रवार, दि. २१ मार्च ऐवजी सकाळच्या सत्रात ' मला आवडलेले पुस्तक' या विषयावर कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक अनंत कदम हे राहणार आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यानंतर ' माझी मराठी अभिजात मराठी ' या विषयावरील परिसंवाद होईल. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. शेषेराव मोहिते हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रदीप नणंदकर, योगीराज माने, डॉ. ज्ञानदेव राऊत, श्रीमती अनिता येलमटे सहभागी होतील. दुपारच्या सत्रात ' लातूरची साहित्य संस्कृती ' या विषयावरील परिसंवाद होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सोमनाथ रोडे हे राहतील. प्रमुख वक्ते म्हणून जयप्रकाश दगडे, डॉ. जयद्रथ जाधव, विवेक सौताडेकर, धनंजय गुडसूरकर उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी दुपारी ४ ते साडेपाच या वेळेत ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे. समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक डॉ. सूर्यनारायण रणसुभे हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक व समीक्षक डॉ. भास्कर बडे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती उज्वला पाटील, शिक्षणाधिकारी ( योजना ) तृप्ती अंधारे यांची उपस्थिती राहणार आहे.
या ग्रंथोत्सवास जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील ग्रंथपाल, कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रंथप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व ग्रंथोत्सव यशस्वी करावा असे आवाहन ग्रंथोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगरचे सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, आत्माराम कांबळे, डॉ. जयद्रथ जाधव, सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी सौ. वंदना काटकर, ग्रंथोत्सव समन्वय समितीचे राजेंद्र कोरे, सुधीर आचार्य, हिरालाल पाटील, पांडुरंग आडसुळे, हावगीराव बेरकीळे यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील ग्रंथपाल, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी या ग्रंथोत्सवास उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे कळविण्यात आले आहे.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0