मनात जिद्द असेल तर महिला कोणतेही क्षेत्र सहज सर करू शकते - श्वेता परदेसी
मनात जिद्द असेल तर महिला कोणतेही क्षेत्र सहज सर करू शकते - श्वेता परदेसी
मनात जिद्द असेल तर स्त्रियांना कोणतीही गोष्ट साध्य करता येते, दोन महिन्याच्या बाळाला पोटाशी बांधून इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये उभे राहता येते आणि स्पर्धा जिंकताही येते, महिलांनी सर्व परिस्थितीवर मात करून यश साध्य केले तर तो खरा महिला दिन होय असे प्रतिपादन महाराष्ट्र भूषण ब्युटी कॉन्टेस्टच्या विजेत्या ब्युटीशियन आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती श्वेता परदेसी यांनी दयानंद कला महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या महिला दिन विशेष कार्यक्रमांमध्ये बोलताना व्यक्त केले.
दयानंद कला महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीतर्फे पंधरा दिवसांचा प्रोफेशनल ब्रायडल मेकअप ट्रेनिंग कोर्स दयानंद कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थिनींना आत्मनिर्भर करणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे या उद्देशाने या कोर्सची निर्मिती करण्यात आली होती. दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने अत्यंत अल्प दरात हा ट्रेनिंग कोर्स मुलींसाठी आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शिवाजी गायकवाड यांनी अध्यक्ष स्थानावरून मनोगत व्यक्त करताना असे प्रतिपादन केले की, कोणत्याही महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या तक्रारी खूप असतात. परंतु आपल्या महाविद्यालयामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीचे अनेक प्रभावी उपक्रम चालत असल्याने अशा घटना अत्यंत दुर्मिळ झाल्या आहेत. त्यांनी या प्रोफेशनल मेकअप कोर्सच्या ट्रेनर अंजली अभिषेक धर्माधिकारी यांच्या कामाचे कौतुक केले.
अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा अंजली जोशी यांनी असे मत व्यक्त केले की, स्त्रियांनी ठरवले तर कोणतीही गोष्ट त्या साध्य करू शकतात फक्त मनात जिद्द हवी. ही जिद्द आणि आत्मविश्वास विद्यार्थिनींमध्ये निर्माण व्हावा म्हणून हा प्रोफेशनल ट्रेनिंग कोर्स विद्यार्थिनींसाठी तयार करण्यात आला आहे,असे त्या म्हणाल्या.
या ट्रेनिंग कोर्स साठी एकूण 33 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्या सर्वांसाठी ब्रायडल मेकअपची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सर्व विद्यार्थिनींनी विविध राज्यांच्या नववधूंचा मेकअप करून आपण प्राप्त केलेल्या कौशल्याची उत्तम झलक दाखवून दिली. त्यातून पहिल्या पाच स्पर्धकांना बक्षीसे देऊन गौरव करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. ज्यामुळे विद्यार्थीनी स्वतंत्रपणे ब्रायडल मेकअप करू शकतील आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. या उद्देशाने या कोर्सची आखणी करण्यात आली होती. पाहुण्याचा परिचय प्रा. सुवर्णा लवंद यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु क्रांती वाघमारे हिने केले.तर आभार ॲनिमेशनच्या विभाग प्रमुख डॉ. दुर्गा शर्मा यांनी मानले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0