प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या - मागणी.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या - मागणी.
दिनांक १७ ऑक्टबर २०२६.
लातूर प्रतिनिधी : लातूरातील
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची लातूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीने लातूर च्या वतीने निवेदनाद्वारे गेली वर्षाभरा पासून लातूर शहरात शैक्षणिक संस्था मनमानी कारभार आणि शैक्षणिक क्षेत्रातील बाजारीकरण, मनमानी फिस शुल्क आकारून शहरात शैक्षणिक माफियांची वाढती गुन्हेगारी चौका चौकातील अतिक्रमण वाहतूक कोंडी व लातूर शहर महानगरपालिका लातूर यांच्या कडून शहरातील नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधाचा अभाव त्यात दुष्काळी परिस्थिती मुळे नागरिकांत असुरक्षित भावना निर्माण होत असल्याने थेट मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांने, लातूर शहराकडे लक्ष देऊन लातूर शहरात विविध शासकीय कार्यालयातील व विविध विभागात शासकीय सेवेत असलेले अधिकरी व कर्मचारी चार वर्षा पेक्षा जास्त काळ त्याच टेबलावर पुन्हा-पुन्हा काम करित असताना दिसून येत आहेत त्या- त्या विभागाचे प्रमुख अधिकारी नियमाचे उल्लंघन करून त्यांची हुकूमशाही करीत असल्याचे कृत्य अनेक वेळा दिसत आहे. अश्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांची तात्काळ बदल्या करून लातूर शहरातील नागरिकांची कामासाठी कार्यालयात हेलपाटे विविध नागरी सुविधा पारदर्शक शासकीय सेवा उपलब्ध करण्याकरिता ठोस उपाय योजना करण्याच्या मागणीचे निवेदन लातूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे सदरील निवेदनावर लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे,सचिव बाबासाहेब बनसोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
Comments 0