पत्रकारांच्या चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप
पत्रकारांच्या चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप
उत्साहात संपन्न पत्रकारांच्या चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप पत्रकारांच्या हक्कांसाठी एकजुटीचा निर्धार प्रशांत ल.ढोणे/विशेष प्रतिनिधी खोपोली पत्रकारांचे हक्क, सन्मान आणि सुरक्षितता जपण्यासोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या हिताला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडिया, कोकण जे विभाग(खोपोली–रायगड) यांच्या वतीने आयोजित एकदिवसीय केडर कॅम्प शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी खोपोली येथील ऋषीवन रिसोर्टमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कॅम्पमध्ये पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच पत्रकारांच्या लहान मुलांना शैक्षणिक किटचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील कार्यसम्राट कोकण विभागातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या योगदानातून भाजपा प्रवक्ते व पत्रकार अजित चव्हाण यांच्या हस्ते या शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेची मूल्ये जपणे पत्रकारांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणे त्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडणे आणि संघटनेचे कार्य अधिक व्यापक करणे हा या केडर कॅम्पचा प्रमुख उद्देश होता. बदलत्या माध्यमविश्वात पत्रकारांना वृत्तांकन करताना येणाऱ्या अडचणी सुरक्षितता, व्यावसायिक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा अशा विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नांवर चर्चा करताना पत्रकारांनी एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असल्याच अधोरेखित करण्यात आले पत्रकारांच्या हक्कांवर गदा आल्यास संघटितपणे आवाज उठविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या कॅम्पचे विशेष आकर्षण ठरले ते पत्रकारांच्या चिमुकल्यांना करण्यात आलेले शैक्षणिक किटचे वाटप. पत्रकार आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक अडचणींना सामोरे जात असतात. त्यांच्या कुटुंबीयांचाही विचार करून मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. पत्रकारांच्या हक्कांसाठी लढण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या हिताची जाणीव ठेवणारा हा उपक्रम व्हॉईस ऑफ मीडियाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला. या कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, महिला विंग प्रदेशाध्यक्ष वैशाली पाटील, राष्ट्रीय संघटक रश्मी मारवाडी, महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य गौतम वाघ, महाराष्ट्र राज्य सहसंघटक सुरेश जगताप, कोकण प्रदेशाध्यक्ष कुमार कडलग , कोकण विभाग उपाध्यक्ष अरुण ठोंबरे, रायगड जिल्हाध्यक्ष रघुनाथ कडू, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष शेखर परब आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिजीत दरेकर उपस्थित होते. तसेच संकेत घेवारे, खालापूर तालुकाध्यक्ष दीपक जगताप, तालुका पदाधिकारी सुधीर देशमुख, जतिन देशमुख व संतोष शेवाळे, यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी सह भाग घेतला. ठाणे जिल्ह्यातून जिल्हा सुप्रीमो मनोज जैन, जिल्हाध्यक्ष गौतम गवई, ठाणे जिल्हा शहर, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जगन्नाथ जावळे, ठाणे महिला विंगच्या सिमरन पांढरे आणि जिल्हा सदस्य त्रिशूल उमाळे यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते. खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीप रामदास शेंडे, खोपोली नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पाटील आणि नगरसेविका महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सुवर्णा मोरे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. डिजिटल युगात पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत असताना संघटनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविणे जिल्हा व तालुका स्तरावर संघटनात्मक काम मजबूत करणे आणि पत्रकारांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. निर्भीड, निष्पक्ष आणि जबाबदार पत्रकारिता करताना पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठीही सकारात्मक उपक्रम राबविण्याचा संदेश या कॅम्पमधून देण्यात आला तसेच पत्रकारांच्या हक्कांसाठी संघटित लढा पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात आणि सशक्त पत्रकारितेसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करत हा केडर कॅम्प उत्साहात संपन्न झाला. त्त्यावेळी प्रशांत ढोणे, बोलताना असे म्हणाले
पत्रकारांची एकजूट
हीच खरी ताकत आहे. पत्रकारांचा सन्मान मिळाला पाहिजे हेच ध्येय आणि सशक्त पत्रकारिता आहे. संकल्प करण्यात आला
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
पूर्व वैमनस्यातून बेदम मारहाण परस्पर गुन्हे दाखल, राजकीय दबावापोटी गरिबावर गंडांतर
October 04, 2024
Comments 0