अनधिकृत_बांधकाम-नांदेड_मनपा_झोन_क्र2
अनधिकृत_बांधकाम-नांदेड_मनपा_झोन_क्र2
नांदेड प्रतिनिधी:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील जवाहर हाऊसिंग सोसायटी लिमिटेड पटेल कॉलनी, विनायक नगर, नांदेड येथे तुकामाई हॉस्पिटलचे भव्य दिव्य अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून त्यानी मनपा बांधकाम परवान्याच्या अटी शर्तीला केराची टोपली दाखविल्या प्रकरणी या हॉस्पिटलचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी मनपा झोनल सहाय्यक आयुक्त यांना बांधकाम परवानाच्या प्रती देऊन मास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत तादलापूरकर यांनी केले तक्रारी अर्ज.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून LMW/B/2020/APL/01201दि.16/02/2020 रोजी तुकामाई हॉस्पिटल ला बांधकाम परवाना देण्यात आले असून या बांधकाम परवान्यातील एकूण 53 अटी शर्तीच्या नियमातील महत्त्वाच्या अटीला केराची टोपली दाखवत अनधिकृत बांधकाम केले असून हे अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडून अतिक्रमण करणाऱ्यांना समान वागणूक द्यावी कारण झोन क्र दोनच्या हद्दीमध्ये जुनी मोटार सायकल खरेदी विक्री करणारे दुकानदाराने अण्णाभाऊ साठे चौक ते आयटीआय पर्यंत फूटपाथ वरच ठिय्या मांडला असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.त्याचबरोबर शुक्रवारच्या आठवडी बाजारासाठी खेड्यापाड्यातून आलेले गोरगरीब लोक आपल्या संसाराची उपजीविका करण्यासाठी दर शुक्रवारी येतात त्या लोकांना रोडच्या कडेला बसण्याची मुभा नाही तात्काळ अतिक्रमण वाले येऊन त्यांच्याकडील साहित्य व विक्रीचा माल जप्त करून घेऊन जातात.आठवडी बाजार वाले अतिक्रमण करतात मग मोटार सायकल खरेदी विक्री करणारे व्यवसायिक अतिक्रमण करत नाहीत का?आणि त्याचबरोबर तुकामाई हॉस्पिटलने बांधकाम परवान्या पेक्षा अधिकचे बांधकाम केले ते अतिक्रमण नाही का? म्हणूनच हा माझा लढा आहे की अतिक्रमण कायदा सर्वांसाठी समान असावा अशी मास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत तादलापूरकर यांनी प्रतिक्रिया दिली.
सदर तुकामाई हॉस्पिटलच्या बांधकाम परवान्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडे दि ०४-०५-२०१९ रोजी विनंती अर्ज केले होते या अर्जाच्या अनुषंगाने खालील कायद्यास नियम,अटी, शर्ती च्या अधीन राहण्याचे सक्तीचे निर्देश देत MCW201900542 अर्जाच्या संदर्भात, महाराष्ट्र प्रादेशिक आणि शहर आराखडा कायदा, १९६६ च्या कलम ४४ आणि बी.पी.एम.सी. कायदा, १९४९ च्या कलम २५३ अंतर्गत, नांदेड येथील मौजा नांदेड, रेव्हेन्यू सर्व्हे नंबर ७४/A भाग, सिटी सर्व्हे नंबर १०९१३ भाग, प्लॉट क्रमांक १२, १३ व १४, रस्ता/मार्ग: हिंगोली रोड,जवाहर हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, पटेल कॉलनी, विनायक नगर येथे इमारत/बांधकाम कार्य करण्यासाठीच्या प्रारंभ प्रमाणपत्र" (Commencement Certificate) / "बांधकाम परवाना" (Building Permit) मंजुरी खालील 53 अटींसह कलम ४५ नुसार बांधकाम परवाना दिले जाते:
मात्र खालील अटी ला केराची टोपली दाखवण्यात आले असून
अट क्र 3 )मी केलेले बांधकाम मंजूर आराखड्यानुसार आहे.
अट ६) या प्रमाणपत्राखाली केलेले बांधकाम किंवा वापर मंजूर आराखड्यानुसार असावा.
अट ७) बांधलेल्या जागेचा वापर मंजूर नकाशानुसार केवळ वाणिज्यिक/निवासी/वाणिज्यिक-निवासी हेतूसाठी करावा.
अट ९) बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रानुसार पूर्ण करावे.
अट १०) जर अधिक बांधकाम किंवा मंजूर आराखड्याबाबत कोणतीही अतिरिक्त माहिती आढळली, तर महाराष्ट्र प्रादेशिक आणि शहर आराखडा कायदा, १९६६ आणि महाराष्ट्र कायदा, १९६५ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
अट ११) पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही बांधकाम केल्यास, परवानगी रद्द समजली जाईल.
अट १२) मंजूर आराखड्यानुसार बांधकाम पूर्ण होईपर्यंत दिलेल्या अटींनुसार कामे करावीत.
अट २५) नगरपालिकेच्या पूर्व लिखित परवानगीशिवाय मंजूर आराखड्यात बदल करू नये. लेआउट/प्लॉट सीमांमध्ये कोणताही बदल करण्यास परवानगी नाही. असे बदल केल्यास, हा बांधकाम परवाना रद्द केला जाईल आणि मालकावर *महाराष्ट्र प्रादेशिक आणि शहर आराखडा कायदा, १९६६ च्या कलम ५३* नुसार कायदेशीर कारवाई होईल.
असे महाराष्ट्र शासनाचे कडक निर्देश असताना सुद्धा तुकामाई मल्टी हॉस्पिटलचे संचालक यांनी अट क्र 3 अट क्र 6 अट क्र 7 अट क्र 9,अट क्र 10,अट क्र 11,अट क्र 12,अट क्र 25 व अट क्र 39 च्या कायद्याला केराची टोपली दाखवत मनमानी अवाढव्य बांधकाम केले आहे. त्याच्या पाठीमागचे मुख्य कारण असे की राजकीय नेत्याचे जवळीक संबंध असल्यामुळे च नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांसोबत हितसंबंध जोपासत या अनधिकृत बांधकामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले की काय ?असा एक प्रश्न नांदेडकरांना पडला असून.
सदर आठवडीबाजार करणाऱ्या शेतकरी बांधवांन सह तरकारी व्यवसाय करून आपल्या परिवाराचे उद्धार निवारण करणाऱ्या गोरगरीब व्यक्तीकडे कसल्याच प्रकारे आर्थिक पाठबळ किंवा राजकीय भारदस्त पाठिंबा नसल्यामुळे यांनाच अतिक्रमण कायदा सक्तीने लागू आहे की काय कळण्यास मार्ग नाही सदर नांदेड मनपा झोन क्र 2 चे कर्तव्यदक्ष सहाय्यक आयुक्त जाधव यांनी राजकीय दबावाला बळी न पडता तुकामाई मल्टी हॉस्पिटल च्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करतील का? याकडे समस्त नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.
सदर या तक्रारी अर्जात असेही नमूद करण्यात आले आहे की, या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने मनपा सहाय्यक आयुक्त जाधव यांनी अनाधिकृत बांधकामावर कामावर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित असून सहाय्यक आयुक्त यांच्याकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्यास दि. 21/6/2025 रोजी पासून मा. जिल्हाधिकारी महोदय नांदेड यांच्या कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असेही मास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांनी लेखी स्वरुपात प्रशासनास कळविले आहे
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
Comments 0